मुंबई (वृत्तसंस्था) शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी दिली जाईल,
(Expansion will give opportunity to new faces and leaders with clean image.)
त्यामुळे शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप काही नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते.(BJP may give chance to some new faces)
भाजपामधून कोणाला संधी मिळणार?
Who will get a chance from BJP?
१) चंद्रकांत पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) गिरीश महाजन
४) प्रवीण दरेकर
५) राधाकृष्ण विखे पाटील
६) गणेश नाईक
७) प्रवीण दरेकर
शिंदे गटातील संभाव्य मंत्री कोण?
१) दादा भुसे
२) उदय सामंत
३) गुलाबराव पाटील
४) शंभूराज देसाई
५) दीपक केसरकर
६) सदा सरवणकर
७) संदीपान भुमरे
८) राजेंद्र यड्राव्हकर
९) संजय राठोड
अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे गोटातील अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार की, नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार मात्र अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

