अमळनेर: प्रतिनिधी– पोलीस वृत्त न्युज : शस्त्री शिक्षणाची उद्धार करती सावित्रीबाई फुले यांनी मुलींचे शिक्षण स्त्री शिक्षणासाठी अतोनात अडचणीवर मात करून मुलींना शिक्षणाच्या प्रोत्सहान देऊन स्त्रीयांना शिक्षणाचा प्रवाहात आणणारी एकमेव स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. या शिक्षणाचा बळावरच आज मुली स्त्रिया देशाचे नेतृत्व करू पाहत आहे. या आदर्श घेऊन आज जिल्हा परिषद शाळेचा चिमुकल्या विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेश धारण करून स्वतःला सावित्रीच बनवून घेत आहेत. स्वतःला अन्यायापासून सक्षम बनण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकल्यांचा मनात फुलेंबद्दल खूप मोठा आदर आहे. यात सावित्रीबाई फुले बद्दल आपले मनोगत व्यक्त करणारी साक्षी ज्ञानेश्वर माळी, श्रावणी योगेश देसले,खूमाशी राकेश पाटील,जीविका विनोद पाटील,गोपिका योगेश पाटील. या विद्यार्थ्यांनी नाटकातून सावित्रीबाई फुले यांचे जीनवन कर्तव्य मुलींसमोर सादर केले. यात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सरांनी वं सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन मुलींना प्रोत्साहन दिले.


