पाचोरा/ खडकदेवळा- (प्रतिनिधी- चेतना हिरे) भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव, एस. एस.एम.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड मां के नाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
एस . एस. एम.एम महाविद्यालय आयोजित रा. से. योजना आयोजित हिवाळी श्रमदान निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे
यातच स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांच्या उत्स्फूर्त सहभागाने एक पेड मां के नाम वृक्षारोपण स्मशानभूमी क्षेत्रात करण्यात आले.
गावातील जनजागृती साठी रॅली काढण्यात आली आणि वृक्ष संवर्धनासाठी घोषणा देण्यात आल्या
सदरील कार्यक्रम नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाने लेखापाल अजिंक्य गवळी, तसेच एन. एस .एस .कार्यक्रम अधिकारी राजेश वळवी यांच्या सहकार्याने पाचोरा तालुका समन्वयक मनोज पाटील यांनी काम पाहिले. खडकदेवळा गावाचे सरपंच यांच्या परवानगीने कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून महिला कार्यक्रम अधिकारी डॉ क्रांती सोनवणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा स्वप्नील भोसले प्रा डॉ सरोज अग्रवाल सा प्रा रोहित पवार उपस्थित होते. अश्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.


