अमळनेर : पोलीस वृत्त न्युज समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने पारोळ्याच्या एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ ९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
गिरीधर इंदरलाल सिंधी (वय४२) रा जैन मंदिर समोर हत्ती गल्ली पारोळा हे मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी एच ६६३८) वर पारोळा जाण्यासाठी अमळनेरहून निघाले. सुमारे ८ वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिल्याने ते मोटरसायकलसह खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. कुणीतरी त्याच्या मोबाईल वरून त्याचे नातेवाईक व्यापारी रविकुमार वसंतकुमार माधवाणी रा सिंधी कॉलनी अमळनेर यांना कळवले. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अमळनेर पोलिस स्टेशनला रविकुमार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१),२८१, १२५(अ), १२५ (ब), ३२४ (४) मोटरवाहन कायदा कलम १८४, १३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.