जळगाव: पोलीस वृत्त न्युज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने जयश्रीताई सुनील महाजन यांनी महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन जळगाव शहरातील विविध भागांत फिरून मतदारांशी थेट संवाद साधला. सदाशिव नगर, यमुना नगर, चौधरी वाडा, कोल्हे वाडा आणि अयोध्या नगर या परिसरात त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. महिला उमेदवार असल्याने निकटवर्तीय कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत . तर जळगाव शहरातील झुकता कल हा जयश्री महाजनांच्या दिशेने आहे. तर जयश्री महाजन चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे आमदारकीचे स्वप्न देखील पूर्ण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जयश्रीताई महाजन यांच्या भेटीदरम्यान मतदारांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर जयश्रीताईंनी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, “महापौर म्हणून काम करताना नगरसेवकांच्या पक्षपातीपणापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य दिले. या कामाच्या बळावरच मी मतदारांच्या विश्वासाला पात्र होण्याची अपेक्षा करते.”
या जनसंवादादरम्यान जयश्रीताईंनी महिलांना विशेष आवाहन केले की, “महिलांनी एकत्र येऊन मला निवडून द्यावे, ही माझी अपेक्षा आहे. शिस्तबद्ध व कुशल कार्य करण्याची सवय असल्यामुळे जळगावला अग्रस्थानी नेण्याचे माझे ध्येय आहे.” शिक्षिकेचा अनुभव असल्यामुळे जयश्रीताईंनी विकासाच्या प्रक्रियेत महिलांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.
तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून जयश्रीताईंनी तरुण मतदारांचे लक्ष वेधले. या निवडणुकीने जळगावात महिलांचे नेतृत्व आणि तरुणांसाठी नवे संधीचे क्षितिज खुले करण्याचे आश्वासन दिले.


