अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव – देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ घडली.
खाचणे ता.चोपडा येथील भानुदास पुंडलिक पाटील(वय -६४) हे खाचणे येथून खाजगी कामानिमित्त दुचाकीने (एम एच १९ ए जे ४३९७) अमळनेर कडे जात असताना अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी फाट्याजवळ चोपडाहुन बदलापूर कडे जाणाऱ्या एस.टी.बस क्रमांक (एम एच २० बी एल २५३८) या बस वरील चालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.यात भानुदास पाटील हे रस्त्यावर दूरवर फेकले गेले.यात त्यांच्या डोक्याला,चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली.त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मयत भानुदास पाटील यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बस चालक शेख मिनाजोद्दिन जहीरोद्दीन (रा.अडावद ता.चोपडा) याच्याविरोधात अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करत आहे.
भानुदास पाटील यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,दोन मुले व नातवंडं असा परिवार आहे. ते विनोद व नरेंद्र यांचे वडील होत.