अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज: तालुक्यात अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नेमकं महाविकास आघाडीत चाललय तरी काय? असा सवाल जनता आता करू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते डॉ अनिल शिंदे यांना तुतारी कडून तिकीट मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. मात्र अधिकृत रित्या शिंदे यांचे नाव आढळून न आल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. तर दुसऱ्या दिवशी साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहे. याबाबत चर्चा सुरू झाली. उमेदवारीसाठी दोन नेत्यांतील झटापट सुरू असून बाकीच्याही उमेदवारांचा पक्षाने विचार करावा? तालुक्यात महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादीत देखील उमेदवारीसाठी इच्छुक नवीन चेहरे आहेत. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहेत यांच्याबाबत पक्षप्रमुख व वरिष्ठांनी पक्षाने कधी विचार केला का? काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यावर नावाजलेले सुभाष पाटील हे नेहमी शेतकऱ्यांसाठी झटत असतात. तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रश्न आला म्हणजे त्या ठिकाणी सुभाष पाटील उभे असतात. आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ते लढत असतात. आज शासन दरबारी आंदोलने मोर्चे जेवढे अर्ज/ निवेदन सादर दिले गेले असतील तर जास्त करुन सुभाष पाटील यांनीच केले आहेत. याबाबत काही प्रश्नच नाही. अशा खऱ्या नेत्यांना पक्षाकडून का डावल जात आहे असे म्हणायला काही हरकत नाही. याबाबत चर्चा व शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आजच्या काळामध्ये अशा नेत्याची गरज तालुक्याला आहे. जो शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहील आणि असा नेता काँग्रेसच्या हाताशी असूनही याचा विचार काँग्रेस का? करत नाही. तालुक्यात नुकसानीचे पंचनामे, अतिवृष्टी, नुकसान भरपाई ,पिक विमा आदींसाठी पुढे सरसावणारा झटणारा शेतकरी नेता सुभाष पाटील यांच्या सोबत तालुक्याची जनता आहे. आजही पक्षासोबत एकनिष्ठ प्रामाणिक आहे. हा विचार काँग्रेस कधी करणार