मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम
अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाइन: कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दगडी दरवाज्यासमोर भव्य व्यासपीठावर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराची शांतता अबादित राहावी, यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा सातव्या, नवव्या व अकरा अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला जाईल, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मंडळांनी साद देत मिरवणुकीत शांतता पाळली. त्यानुसार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्हि. व्हि. कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, खा.शि. मंडळ उपाध्यक्षा माधुरी पाटील, काँग्रेसच्या सुलोचना वाघ, माजी जि. प. सदस्य ॲड. व्हि. आर. पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, विनोद अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, विजय माहेश्वरी, अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन, पंकज मुंदडे, निर्मला बडगुजर, विजय पवार, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील, माजी नगरसेवक बाळा पवार, जितेंद्र जैन, निरज अग्रवाल, सुभाष चौधरी, ॲड. शकिल काझी, राष्ट्रवादीचे मुक्तार खाटिक, इम्रान शेख, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, विनोद कदम, निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, अनिल बेंडवाल, संतोष बिऱ्हाडे, पंकज भोई आदी मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘या’ गणेश मंडळांचा झाला सन्मान
शिव प्रेरणा गणेश मित्र मंडळ, आर के नगरचा राजा, स्वामी मित्र मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळ, श्रीराम गणेशोत्सव मंडळ, बंगाली माता मित्र मंडळ, श्रीराम गणेश उत्सव मंडळ, लक्ष्मी नगरचा राजा,
राजे ग्रुप गणेश मंडळ, अमलेश्वर नगरचा राजा मित्र मंडळ, शिव शंभू गणेश मंडळ, ओम साई राम मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, ओम साई राम मित्र मंडळ, संत सावता माळी गणेश मंडळ, इच्छादेवी चौक मित्र मंडळ, राजे संभाजी गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश मंडळ, ओम साई सेवक गणेश मंडळ, गणराया मित्र मंडळ, विजय कला मित्र मंडळ, बालाजी गणेश मित्र मंडळ. सम्राट पवन चौक मित्र मंडळ, संत सावता माळी मित्र मंडळ, मंगलेश्वर गणेश मित्र मंडळ. ओम मित्र मंडळ, शिवराय मित्र मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, भगवा चौक गणेश उत्सव मंडळ, नवयुवक मित्र मंडळ, टिळक गणेश मंडळ, नगरपरिषद कर्मचारी मित्र मंडळ, शिव सप्तशृंगी कॉलनी, पिंपरी गलीचा राजा मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, कालभैरव मित्र मंडळ, केशवनगर मित्र मंडळ, शिवमुद्रा गणेश मंडळ, प्रताप कुमार गणेश मंडळ, सिद्धिविनायक गणेश मंडळ, सद्गुरु मित्र मंडळ, त्रिमूर्ती गणेश उत्सव मंडळ, न्यू प्लॉट गणेश मंडळ, जय झुलेलाल गणेश मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, जय शंकर मित्र मंडळ, जय शिव मित्र मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश मंडळ, जय बजरंग गणेश उत्सव मंडळ, मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळ, गजानन बाबा नगर मित्र मंडळ. जय जिजाऊ मित्र मंडळ, भोई वाड्याचा राजा माऊली मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, शिवशाही मित्र मंडळ, महावितरण विद्युत मंडळ, जय झुलेलाल मित्र मंडळ, सूर्यमुखी मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, हरी ओम गणेश मंडळ, मच्छी मार्केट मित्र मंडळ, साने गुरुजी सांस्कृतिक मित्र मंडळ, युवा बालाजी मित्र मंडळ, युवा राजे शिवाजी मित्र मंडळ, शिवछत्रपती साने नगर तांबेपुरा मित्र मंडळ, जगदंब ग्रुप पिंपळे रोडचा राजा, युवा कोंडाजी मित्र मंडळ, बाबा गँगचा राजा, ट्रक टर्मिनल शॉपिंग कॉम्प्लेक्स मित्र मंडळ.
मिरवणुकीदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी सातव्या व नवव्या दिवशी चहा, नास्ता व पाण्याची तसेच अकराव्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी व व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांनी अनमोल सहकार्य केले.