पोलीस वृत्त ऑनलाईन: अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीमध्ये तिरंग्याच्या अवमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. स्वातंत्र्यदिनी फडकावलेला झेंडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उशिरापर्यंत उतरवलाच नाही.

अकोल्यातली शिवाजी चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल केले आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्नेहलता कुलकर्णी (मुख्याद्यापिका) स्वाती धोत्रे (शिक्षिका) आणि वर्षा काळणे (शिक्षिका) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेत सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. या ध्वजारोहनाला विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी हजेरी लावली. ध्वजारोहन झाल्यानंतर शिक्षक सुट्टीची मजा करण्यासाठी निघून गेले.
त्यामुळे रात्री साडेसात वाजूनही ध्वज खाली उतरवण्यात आला नाही. संध्याकाळी 6.55 वाजेपर्यंत ध्वज खाली उतरवणे होते अपेक्षित. मात्र, ठरवून दिलेल्या वेळेनंतरही ध्वज उतरवण्यात आला नाही. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबतची माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांना माहिती दिली.
या घटनेबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांच्या तक्रारीनंतर शासनाने नेमून दिलेल्या वेळेत झेंडां न उतरविल्याने राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे आढळून आले. त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

