पारोळा- (पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क) तालुक्यातील करंजी येथे दि,४ च्या मध्य रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला यात अनेक थेट घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले.

याबाबत सवस्तर माहिती पारोळा तालुक्यातील करंजी येथे दि,४ च्या मध्य रात्री अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली व धो धो पाऊस कोसळत होता,जनु काही ढगफुटी च झाली आहे. यात गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, तर शेतातातील पिके पाण्यात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते आहे, दि,५ रोजी सकाळी
पारोळा तहसीलदार अनिल गवांदे, पारोळा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, यांच्या सह
महसूल विभागाचे अधिकारी व व तलाठी यांनी तातडीने भेट दिली.
तहसीलदार अनिल गवांदे यांनी महसुल विभागाला तातडीने घटनास्थळी पंचनामे करण्याचे आदेश दिले, यात प्रामुख्याने गावातील बळिराम ताराचंद भिल,शरद बंसिलाल भिल,नंदु मोहन भिल, दिलिप भिल, रमेश भिल,दत्तु महादु माळी,संजय हिम्मत पाटील, साहेबराव महादु पाटील, यांच्यासह अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनीय दिसून आले आहे, सुदैवाने यात कुठेलीही जिवितहानी झालेली नाही.

