देहूगाव : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध ठेवू देत नाही म्हणून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना पिंपरी चिंचवड येथे देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात २० जून रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे
याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रतीक्षा जयदीप यादव (वय-२१) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती जयदीप अर्जुन यादव (वय-२९, रा. देहूगाव, मूळ. रा. चिखलगोल, सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कोल्हापुरातील कुरूंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे एम. एस. सी.पर्यंत शिक्षण झाले होते. डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेला जयदीप यादव आणि प्रतीक्षा हे दोन महिन्यापूर्वी विवाहबंधनात अडकले. जयदिप हा खाजगी कंपनीत पुणे येथे नोकरीला आहे. ८ दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला घेऊन देहूगाव येथे दोघे राहण्यास आले होते.
पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीपला होता. त्यावरून त्याने गुरुवारी रात्री प्रतिक्षाला घेऊन देहूगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला गेला. त्या ठिकाणी ओढणीने प्रतिक्षाचा गळा आवळून त्याने खून केला. संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नातेवाईकांनी जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे करीत आहेत.