जळगाव- पोलीस वृत्त ऑनलाईन – दि.२४ रोजी रेल्वे स्टेशन जळगाव प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक इसम आजारी अवस्थेत मिळून आल्याने त्यास औषध उपचार कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे नेले असता माननीय ऑन ड्युटी सीएमओ यांनी सदर इसमास तपासून मृत घोषित केले आहे. ओळख पटविण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर मयत इसम हा कोणत्यातरी दीर्घ आजाराने नैसर्गिक रित्या मयत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली सदर व्यक्ती अनोळखी असल्याचे समजले. तरी सदर अनोळखी इसमाचे नातेवाईकांच्या शोधू होणे कामी लोहमार्ग पोलीस जळगाव यांचा ओळख पटविण्याचे आव्हान जळगाव लोहमार्ग पोलिसांनी केलेले आहे. अनोळखी इसमाचे वर्णन, वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष उंची ५×६, रंग सावळा, अंगात नेसणीस गुलाबी रंगाचे फुल बाहीचे मळकट शर्ट , निळ्या रंगाची पॅन्ट, पुढील तपास पो. ना. हिरालाल चौधरी हे करीत आहेत.

