अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – नोकरी असो की उद्योग व्यवसाय हल्लीचे तरुण वेगवेगळ्या वाटा चोखळून त्यामध्ये यश मिळवत आहेत. अमळनेर तालुक्यातील शिरुड गावच्या यश सचिन धनगर या युवा तरुणाची अशीच काहीशी कहाणी आहे. डिप्लोमा झाल्यानंतर बीएससी शिक्षण घेत असलेला यश ने हा दुग्ध व्यवसाय सूरू केला असून आज त्या व्यवसायातून महिन्याला ३ लाख रुपयांची कमाई करतोय. एका म्हशीपासून सुरू झालेला त्याचा दुग्ध व्यवसाय आता एकवीस ते बावीस म्हशी पर्यंत पोहोचलाय. आणखी दहा म्हशी मागवून या व्यवसायाला विस्तारित करण्याचा यश याचा मानस आहे .
यश धनगर हा शिरुड या खेडेगावातील रहिवासी असून २३ वर्षाचा आहे. शिक्षण घेऊन नोकरी करणं त्याच्या मनाला कधीच पटलं नाही. म्हणून त्याने एका म्हशीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. दुग्धव्यवसायातील आर्थिक गणित लक्षात आल्यानंतर त्याने हा व्यवसाय वाढवत नेला.
सध्या यश याच्याकडे तब्बल २१ ते २२ म्हशी आहेत. या म्हशी पासून एकावेळी ८५ ते ९० लिटर दूध जात असत तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचे मिळून एकून १७० ते १८० लिटर दुध डेअरीत जात असुन यातून त्याला दररोज १० हजारांपेक्षा जास्त पैसा हा तरूण कमावत आहे. तसेच त्याचबरोबर म्हशींपासून निघणाऱ्या शेणाच्या घरच्या शेतात खत म्हणुन वापर करत तर बाकी खत विक्रीतून त्याला चांगला पैसा मिळवतो हे
———————————————-
शिक्षणासोबत माझा अभ्यास ही सूरू होता पण जास्त आवड मला नोकरी पेक्षा व्यवसायात होती म्हणुन माझ्या घरची अगोदर एकच म्हैस होती मी वडिलांना सांगितलं की मला दूध व्यवसाय करायचा वडिलांनी होकार दिला लगेच मी सुरवातीला ५ लाख रूपये कर्ज घेतली ६ म्हशी आणल्या त्यावर मी त्याच म्हशींच्या उत्पन्नातून त्या पाच लाख रुपयांची परत फेड करुन त्याच कमाईतून म्हशीं वाढवत गेलो तर आज माझ्या कडे २१- २२ म्हशी आहेत तसेच माझ्याकडे कामाला २ मानस आहेत व स्वतः मी देखील मेहनत करतो नोकरी करून १० -१५ हजारांची कमाई करण्यापेक्षा आज महिन्याला 3 लाखापेक्षा जास्त कमावतो तर सर्व खर्च वजा करत मला दीड लाख रूपये नफा निघतो अशी यश ने व्यक्त करतो.
यश धनगर – दुध उत्पादक शेतकरी