अमळनेर पोलीस वृत्त न्यूज:- अमळनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (३५, रा. डांगरी ता. अमळनेर) याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली, डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास याआधीच अटक झाली होती. यानंतर त्याला डांगरी -करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली.
यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान तो शौचास गेला. तिथे त्याने पांघरण्यास दिलेली चादर फाडून गळफास घेतला.
बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही, म्हणून गार्डने चौकशी केली, त्यावेळी आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.