पोलीस वृत्त- (न्यूज नेटवर्क)

तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून ओळखतो, त्यांच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात पण आज मान उंचावणारी गोष्ट म्हणजे
देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे. परंतु त्यांना या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खडतर प्रवास अन् चिकाटी करावी लागला आहे.
यासंदर्भातील माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते. पण त्यांना इथपर्यंतचा प्रवास खूप खडतरपणे पार करावा लागला आहे. या प्रवासानंतर त्यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला आहे. यानंतर रूपाली चाकणकर यांनी त्यांना याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

