चाळीसगाव (प्रतिनिधी) सोमवारी (Monday)सायंकाळी गौताळा अभयारण्यात फिरण्यासाठी गेलेल्या भरकटलेल्यामुळे १५ युवकांचा जीव टांगणीला आला होता. परंतू पाच तास शोधमोहीम राबवत, वनकर्मचाऱ्यांनी मध्यरात्री १२ वाजता सर्वांना बाहेर काढले. पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार सांगतांना युवकांचे डोळे पाणावले

असा चुकला रस्ता
धुळे येथील १० आणि चाळीसगाव येथील ५ असे १५ जण सोमवारी पाटणादेवीच्या दर्शनाला आले होते. अभयारण्यात फिरताना ते पितळखोरा लेणी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, परत जाताना सायंकाळी अंधार पडला. त्यामुळे सर्वजण रस्ता चुकले. जंगलात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. काही वेळाने मोबाईलला नेटवर्क (mobile network) मिळाल्यानंतर त्यांनी खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदारांनी यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (forest officer) ज्ञानेश्वर देसाई, खासदारांचे स्वीय सहायक अर्जुन परदेशी यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाच तास वनकर्मचाऱ्यांनी जंगलात शोध घेतला. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास या १५ जणांना शोधण्यात यश आले.
शेकोटीभोवती थांबवले
मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी वाट चुकलेल्या तरुणांशी संपर्क केला. त्यावेळी भयभीत तरुणांनी रडतच आपबिती कथन केली. ठोंबरे यांनी तरुणांना धीर देत शेकोटी पेटवून एकाच जागी थांबण्याच्या सूचना दिल्या.
वनकर्मचारी आणि भरकटलेल्या युवकांची नावे
वन कर्मचारी नागू अगीवले, नवशीराम मधे, अशोक अगीवले, रंगनाथ अगीवले यांनी अंधारात युवकांना जंगलातून बाहेर काढले. धुळे येथील सागर जगताप, देविदास केदार, दीपक वाघ, रुपेश वाघ, प्रशांत पाटील, मयूर पाटील, कुणाल लाड, जयवंत आहिरराव, कुणाल शेलार, सागर लष्कर, चाळीसगाव येथील राहुल सुर्यवंशी, रोहित अंडागळे, बाळा सुरवाडकर, निखिल निंभोरे, उमेश निकम यांची सुटका करण्यात अाली.

