जळगांव: पोलीस वृत्त ऑनलाईन– येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेले आदिवासी टोकरे कोळी बांधव यांचे आमरण उपोषण २१ दिवस झाले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ आज त्यांचा संपर्क कार्यालयाला *”ताला मारो”* अनोखे आंदोलन केले.आंदोलन कर्ते प्रा.भाऊसाहेब सोनवणे,मंगला सोनवणे,हिरालाल सोनवणे,आशा कोळी,छाया कोळी यांनी सांगितले की जर का आमच्या आदिवासी टोकरे कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या दिले नाही तर येणाऱ्या काळात याची किंमत शासनाला मोजावी लागेल.तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री महोदय २१ दिवसापासून भेट द्यायला आलेले नाही मग यांना फक्त आदिवासी टोकरे कोळी बांधव फक्त मतदान पुरता आहे का…!या पुढे तिन्ही मंत्री महोदय यांना गावबंदी केली जाईल कारण की मंत्री जळगांव ला येऊन उपोषण स्थळ जवळुन आले पण साधी येण्याची तसदी घेतली नाही.याच्या पुढे मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा देण्यात आला.आदिवासी विकास मंत्री गावित यांनी गिरीश महाजन यांना टोकरे कोळी जमातीला संपविण्याची सुपारी जिल्हाधिकारी तसेच सात ही प्रांत यांच्या मार्फत दिली आहे असे आंदोलन कर्ते प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केला आहे.या मंगला सोनवणे वेळी बबलू सपकाळे,व समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


