• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकींग! जळगावचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर अटक…

policevrutta by policevrutta
January 15, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ब्रेकींग! जळगावचे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर अटक…
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित पो नि.किरणकुमार बकाले यांचा सुमारे दिड वर्षांपासून अधिक काळापासून शोध सुरू असतानाही ते यंत्रणेला सापडत नव्हते. पोलिस यंत्रणेवर यामुळे टिकेची झोडही उठली होती मात्र सोमवार, 15 जानेवारी रोजी सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलिस अधीक्षक कार्यालयात सरेंडर झाले आहेत.

पोलिस यंत्रणेचा दबाव वाढताच बकाले हजर
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाले नसल्याने बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले हे सोमवारी पोलिसांपुढे हजर झाले.

पोलिस उपअधीक्षकांकडे जाब-जवाब
जळगाव पोलिस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत यांच्याकडे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांच्यापुढे त्यांचा जवाबजवाब सुरू आहे.

का वॉण्टेड होते बकाले ?
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज टाकण्यात आला होता. परंतू तेथे देखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता.

होम डिवायएसपींकडे होता तपास
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती मात्र दरवेळी बकाले हे चकवा देण्यात यशस्वी होत होते.

Previous Post

ब्रेकींग! पोलिसाचा खून चाळीसगांव हादरले; ४ संशयित ताब्यात

Next Post

ब्रेकिंग : संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत बापाला संपविले

policevrutta

policevrutta

Next Post
ब्रेकिंग : संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत बापाला संपविले

ब्रेकिंग : संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत बापाला संपविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!