नेपाल : येथून एक धक्कादायक घटना समोर आले आहे नदीवरील पूलाचा कठडा तोडून बस पाण्यात गेल्याने अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य पश्चिम नेपाळमधील डांग जिल्ह्यात शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री उशीरा घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची पुष्टी नेपाळ पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भालुबांग येथे हा अपघात घडला. नेपाळ पोलिसंनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, बांकेच्या नेपाळगंज येथून काठमांडूला जाणारी प्रवासी बस पुलावरून पलटी होऊन राप्ती नदीत कोसळली.
नेपाळमधील भालुबंग(Nepal bhalu bang) येथील एरिया पोलीस कार्यालयातील मुख्य पोलीस निरीक्षक उज्ज्वल बहादूर सिंग यांनी बस अपघात कसा घडला याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली आहे. ज्यामध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. उर्वरीत मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, बसमधील जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत