अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – तालुक्यातील खडके येथून एक महिला व तिचा लहान मुलगा दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार अमळनेर पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील खडके येथील प्रमिला कपिलदेव पाटील(वय-२४) व त्यांचा दीड वर्षीय मुलगा प्रसाद कपिलदेव पाटील हे ३१ डिसेंम्बर (रविवार) च्या सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून खडके येथून बस मध्ये बसले मात्र सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही मिळून न आल्याने कपिलदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार अमळनेर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सफौ. संजय पाटील करत आहेत.

