जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन– एकाच वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा असे दोघे बेपत्ता त्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील संत कंवरराम नगरात हा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असल्यामुळे दोघांना पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गरिमा जितेंद्र तुलसी girma Jitendra Tulsi (वय सुमारे 15 वर्ष) आणि रोनक दिपक सिंग Ronak Deepak Singh (वय सुमारे 15 वर्ष) अशी बेपत्ता अल्पवयीन मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले कुणाला आढळल्यास अथवा कुणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने एमआयडीसी पोलिस स्टेशनला 02572210500 या क्रमांकावर अथवा पोलिस निरीक्षक जयपाल हिरे (8888897686), पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे (9028222666) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.