अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून दोन दिवसात १३ जणांना लचके तोडले आहेत. गंभीर चावा घेतल्याने तीन जणांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.
मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही काही कुत्र्यांवर गंभीर आजार देखील दिसून येतात. शहरासह ग्रामीण भागात देखील मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली आहे या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

१८ रोजी सायंकाळी कसाली मोहल्ल्यातील आखाडा चौकात एकाच कुत्र्याने हल्ला चढवत अली खान मोहसीन खान (वय ९ ),
शाहनवाज शाह फिरोज शाह (वय ९), परवेज शाह आसिफ शाह (वय ८ (या तिघांवर खेळत असतान एकाला पाठीवर दोघांच्या हातावर गंभीर चावा घेतला. त्यापैकी मोहसीन व शाहनवाज या दोघांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सारबेटा येथील ४० वर्षीय शशिकांत पाटील, ताडेपुरा येथील सात वर्षाचा इशांत भिल, आरोही पाटील (वय ८ वर्षे), कस्तुराबाई माळी, प्रशांत कोळी (वय ११), राजेश रणदिवे (वय ३८(, देविदास पवार (वय ६५), मयुरेश विसपुते (वय २४ (, राम
लखवाणी (वय ४२), जयेश गायकवाड (६ वर्षे) याना पिसाळलेल्या
कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जयेश याला देखील गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी धुळ्याला रवाना केले आहे. इतरांवर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

