जळगाव पोलीस वृत्त ऑनलाइन: दि. २ रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मयत व्यक्तीचे ओळख पटण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव प्लॅटफॉर्म नंबर 03 वर कि.मी.419/23 जवळ डाऊन ट्रेन नं.12779 गोवा एक्स. च्या मागील जनरल बोगीतून प्रवास करीत असतांना कोणत्यातरी दिर्ग आजाराने एकाचा मृत्यू झाला असुन या घटनेची माहिती ऑन ड्युटी डी वाय एस एस रेल्वे स्टेशन जळगाव श्री. संतोष ठाकूर यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने धाव घेत तपासणी केली. सदरील व्यक्ती अनोळखी असल्याचे समजले. मयताचे वर्णन केस काळे, रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 05 बाय 2, अंगात पांढऱ्या रंगाचा बनियान, निळ्या रंगाची लोवर पँट, हिरव्या रंगाचा अंडरवेअर, उजव्या हातावर G.S.G गोंधलेले, अंदाजे वय 35 ते 40 वर्ष हे दिनांक 02/09 /23 चे 12.25 वाजे पूर्वी रेल्वे स्टेशन आजाराने मयत झालेला आहे तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे करिता नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलीस जळगाव यांचे मार्फतीने करण्यात येत आहे. पुढील तपास पो.ना हिरालाल चौधरी करीत आहे.


