अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्याची खरीत हंगाम २०२३ ची वास्तविक परिस्थिती अवगत करतो.. तालुक्यात मागील अडीच महिन्यात सरासरीच्या ५० टक्के सुध्दा झालेला नाही. तसेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात तालुक्यात कुठेही पाऊस झालेला नाही. तालुक्यातील सर्वच पिकांची वाढ खंटलेली आहे. बरीच पिके पाऊसा अभावी वाळली. खरीप हंगाम पुर्णपणे हातातून गेला व शेतकऱ्यांनी केलेला खर्च पण वाया जाणार आहे. तरी संपूर्ण तालुका दुष्काळ जाहिर करावा हि विनंती.
तालुक्यात कृत्रिम पाऊस पाडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी हि विनंती. कांदा निर्यातीवरील ४० टक्के कर तात्काळ रद्द करावा व शेतकऱ्यांना कांद्याला ४०००/-
रुपये हमी भाव मिळून द्यावा. तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंगल सुपर फासफेट दाणेदार या खतामुळे जे जमिनीचे व पिकांचे
नुकसान झाले आहे ते तात्काळ सरकारने मिळून द्यावे याबाबतचे निवेदन जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.


