आता टोल नाक्यापासून वाहनधारकांची लवकरच सूटका होणार म्हणजे त्यांना टोल भरावा लागेल. पण त्यासाठी त्यांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही.
वाहन धारकांची वेळेची बचत व्हावी म्हणून टोल नाक्यांवर GNSS यंत्रणा बसविण्यात येणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
पहा कशी आहे GNSS यंत्रणा
तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी टोलनाक्यावर वाहनधारकांना सरासरी 734 सेकंद थांबावे लागत होते. पण आता FASTag लावल्यामुळे हा कालावधी घटून केवळ 47 सेकंदावर आला आहे. मात्र आता GNSS यंत्रणेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज नसेल. म्हजने वाहनधारकांच्या खात्यातून टोल आपोआप कपात होईल.
यामध्ये दोन तंत्रज्ञान आहे. पहिले तंत्रज्ञान वाहनातील जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीवर आधारीत महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापण्यात येतील.
तर दुसरे तंत्रज्ञान हे नंबर प्लेटवर आधारीत आहे. नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल जी सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यास मदत करेल.
या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉईंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदवली जाईल. यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तिथेही त्याची नोंदणी केली जाईल. या दरम्यान, महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालले त्याआधारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोल कपात होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी शुक्रवारी झालेल्या राज्यसभेत दिली.


