पोलीस वृत्त(न्युज नेटवर्क) जळगाव- देशातील हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करायला व त्यांना केंद्र सरकार ने परत बोलावून घ्यावे ह्या करता युवासेना जळगाव महानगरतर्फे रविवारी जळगाव शहरातील काव्यरत्नवली चौक व नेहरू चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “भगतसिंग कोश्यारी यांचा धिक्कार असो…”, “या राज्यपालाचं करायचा काय ? खालती डोकं वरती पाय…” अश्या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अमोल मोरे, राहुल पोतदार, जय मेहता, अभिजित रंधे, सागर कुटुंबळे, महेश ठाकूर, गणेश गायकवाड, प्रशांत फाळके, उमेश चौधरी, गिरीश चौधरी, पंकज जोशी, निलेश जोशी, विलास पवार, बन्सी माळी, वासिम खान, ललित धांडे आदी उपस्थितीत होते.