जळगाव:पोलीस वृत्त ऑनलाईन– नशिराबाद येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेल्या लहान बालक मात्र अपघातात किरकोळ मार लागला असुन बाचवला. अत्यंत दुर्दैवी घडली आहे याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली
शेनफडू बाबुराव कोळी(shenpadu baburav koli) (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर) हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवारी २४ जून रोजी सकाळी(asoda) आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते परत निघाले. त्यांचा दाजी शंकर कोळी याने, त्यांना नशिराबाद, कुऱ्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार ते नशिराबाद मार्गे दुचाकी (क्र. एमएच १९ ए ए २०९५) ने निघाले.
काही वेळांनंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी (Bharati koli) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला (Shenfadu died during treatment)आहे. तर रुद्र हा घटनास्थळी रडत होता. त्याला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.
दरम्यान, मयत कोळी परिवाराच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. तपस एपीआय मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.


