एरंडोल: पोलीस वृत्त- ऑनलाईन कौटुंबिक वादाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या खून केल्याचा धक्कादायक घटना गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. हर्षदा किरण मराठे (वय २७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत विवाहितेचे नाव असून तर संशयित पती किरण महादू मराठे (वय ३५) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एरंडोल गांधीपुरा भागात राहणारे मराठी दाम्पत्य १९ जून दुपारी १ वा कौटुंबिक वादामुळे संतापाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केले अतिरक्तवसराव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी धाव घेत पंचनामा केला व व संशयित आरोपी पती केर मराठी याला ताब्यात घेण्यात आले.


