चाळीसगाव-हरिद्वार येथे यात्रेसाठी आई-वडील जात असल्याने त्यांना रेल्वे गाडीत बसवून नंतर उतरत असतांना गाडीचा वेग वाढल्याने नियंत्रण सुटून गाडीखाली आल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५.२० वाजता घडली.या शिक्षकाचे नाव योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (४१) असे आहे.
आई-वडील हरिद्वार येथे जात असल्याने त्यांना सोडण्यासाठी गुरुवारी पहाटे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर योगेश पाटील गेले होते. आई-वडिलांना दादर-अमृतसर एक्सप्रेस मध्ये बसविले असता त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरतांना रेल्वे गाडीत ओढले गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.हा प्रकार प्लँट फार्म वरील काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पण काहीच उपयोग झाला नाही.रेल्वे पोलीसांनी त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला.याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत शिक्षक योगेश पाटील यांच्यावर आज दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.ते जिपचे माजी सदस्य धर्मा रामा वाघ याचे जावई होत.

वेग वाढल्याने नियंत्रण सुटून गाडीखाली आल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५.२० वाजता घडली.या शिक्षकाचे नाव योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (४१) असे आहे.