छत्रपती संभाजीनगर: पोलीस वृत्त ऑनलाईन समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. (दि २४) च्रोजी पहाटे 3 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघा भावांचा मृत्यू झाला. चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. दरम्यान हे चौघे भावंड दोन दिवसांपूर्वी तेलंगणा(telangana)येथे काकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून सुरतकडे(surat) जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक मुलगा सुदैवाने बचावला आहे(.An unfortunate incident happened. Fortunately, one boy survived the accident.)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे करमाड- शेकटा (karmad shekata) गावाजवळ घडला. या अपघातात संजय राजणभाई गौड (वय ४३), कृष्णा राजणभाई गौड (वय ४४), श्रीनिवास रामू गौड (वय ३८), सुरेशभाई गौड (वय ४१) (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) अशी ठार झालेल्या चौघा चुलत भावंडांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गौड कुटुंबीयांचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबातील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याने हे चौघे दोन दिवसांपूर्वी अंत्यविधीसाठी तेलंगणा येथे गेले होते. दरम्यान, काल रात्री चौघे अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून पुन्हा सूरत येथे जाण्यासाठी निघाले होते. समृद्धी मार्गाने जात असतांना आज पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली
यामुळे वेगात असलेली त्यांची कार दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघा भावांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.(In this case, sudden death was registered in Karmad police station.)


