• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home राज्य

बापरे..! पैशांचा पूर उचलण्यासाठी लोकांची झुंबड, इतके पैसे आले कुठून?

policevrutta by policevrutta
May 7, 2023
in राज्य
0
बापरे..! पैशांचा पूर उचलण्यासाठी लोकांची झुंबड, इतके पैसे आले कुठून?
0
SHARES
603
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिहार: मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या मुरादाबादजवळील कालव्यातून मोठ्या प्रमाणात नोटा (रोख) मिळाल्याची माहिती मिळाली. शनिवारी अचानक लोकांना कळालं की, मुरादाबादच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात रोकड टाकण्यात आली आहे, मग काय? याची माहिती मिळताच नोटा लुटण्यासाठी गर्दी झाली होती. आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल घेऊन पळू लागले.

यातील बहुतेक नोटा 10 आणि 100 च्या असल्याचं सांगितलं जात आहे. नोटा लुटण्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यावर ते बघून तिथे मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच मुफस्सिल फसिल पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. नोटांचे बंडल वाहताना पाहून लोकांना आश्चर्य वाटलं.

पहाटे नोटांचे बंडल पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल उचलण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही रोकड कुठून आली किंवा कोणत्या प्रकारची नोट आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही नोट खरी आहे की खोटी? हेदेखील अद्याप समजू शकलं नाही


सर्व तपासानंतरच कळू शकेल, मात्र सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवलं. प्रत्यक्षदर्शी पवन कुमार आणि अक्षय कुमार यांनी सांगितलं की, बहुतांश नोटा पाण्यात गेल्याने ओल्या झाल्या होत्या. नोटांचे बंडल दोरीने बांधलेले होते. बांधलेल्या बहुतेक नोटा 10 च्या होत्या.

त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्या उचलून आपापल्या घरी नेल्या आणि उन्हात वाळवायला सुरुवात केली. या गोंधळात नोटांचे बंडलही विखुरले. ही अफवाही असू शकतं, पण तपासानंतरच काही सांगता येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस सर्व मुद्यांवर तपास करत आहेत.

मुफस्सिल पोलिस स्टेशनचे अध्यक्ष रिजवान खान सांगतात की, मुरादाबाद पुलाजवळ गोंधळ सुरू असल्याची बातमी आली होती. ज्याच्या माहितीवरून ते एका टीमसह पोहोचले. त्यांनी सांगितलं की, काही लोकांनी पैसे पाण्यात विखुरल्याचे सांगितलं आहे, परंतु ही अफवा देखील असू शकते. याचा तपास सुरू असून त्यानंतरच काही सांगता येईल.

एवढी मोठी रक्कम कालव्यात का फेकली गेली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र कालव्यात सर्व पैशांचे बंडल आले, मग ते आले कुठून? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. हा पैसा कोणत्यातरी नेत्याचा असल्याची चर्चा काही लोक करत आहेत. त्यांनी ईडीचे छापे टाळण्यासाठी पैसे फेकून दिले आहेत किंवा तो काळा पैसाही असू शकतो. ज्याच्यापासून वाचण्यासाठी कोणीतरी ते फेकून दिले असावे.

Previous Post

खान्देशची वाघिणी… एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व…प्रा. जयश्री दाभाडे-साळुंके

Next Post

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी – आता या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास महिन्याला मिळणार ५०० रुपये

policevrutta

policevrutta

Next Post
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी – आता या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास महिन्याला मिळणार ५०० रुपये

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - आता या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास महिन्याला मिळणार ५०० रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!