पोलीस वृत्त- ऑनलाइन: पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


