डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचे सर्व श्रेय डॉ भीमराव आंबेडकर यांना जाते.
भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक मागासवर्गीयांची निराशा दूर केली आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. आंबेडकर यांनी नेहमीच जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला.
जातीय भेदभावामुळे भारतीय समाज पूर्णपणे अपंग बनलेला होता. अश्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर एक मसीहा बनून दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यामुळे बर्याच प्रमाणात सामाजिक परिस्थिती बदलली.