चांदवड: आसरखेडाजवळ ST बसचा भीषण अपघात झाला असून याचे काही फोटो समोर आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे.(The female conductor died on the spot in the horrific accident.)
याशिवाय 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी असल्याचंही समोर आलं आहे. सध्या जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्यामुळे बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. एसटी बस नांदूरीगड (nandurigad)येथून मनमाडकडे(manmad) जाताना हा भीषण अपघात झाला.