दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात शुक्रवारी एका घरातून ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सर्व जण झोपेत असताना डासांपासून बचाव करण्यासाठी रात्रभर जाळण्यात आलेल्या औषधामुळे तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड त्यांच्या शरीरात गेला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. नॉर्थ इस्ट दिल्लीच्या डीसीपींनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, काल दिल्लीतील रात्री शास्त्री पार्कमध्ये एकाच कुटुंबातील लोक हे डास घालवणारे कॉइल पेटवून झोपले होते. त्यानंतर कॉइलमुळे उशीला आग लागली. आगीत भाजून दोघांचा मृत्यू झाला. तर 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगांनी तपास करत आहेत