सुरत: (पोलीस वृत्त-ऑनलाईन) सुरत येथील हिरे व्यावसायिकाच्या अवघ्या 8 वर्षांची चिमुरडी मुलगी देवांशी (Dvanshi jain) हिने जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. या मुलीनं विलासी जीवन सोडून भिक्षुत्व स्वीकारण्याचा घेतला निर्णय
देवांशी मोठी झाल्यावर करोडो रुपयांच्या हिरे कंपनीची मालकीन बनली असती.परंतु तिने सर्व ऐशोआराम व चांगले करिअर सोडले आणि संन्याशी जीवन स्वीकारले. दिवांशीचे वडील हिरे व्यापारी धनेश आणि त्यांचं कुटुंब खूप श्रीमंत आहे. परंतु त्यांची जीवनशैली अतिशय साधी राहिली. त्यांचे घराणं सुरुवातीपासूनच धार्मिक आहे. 8 वर्षांच्या देवांशीला हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषा अवगत आहेत. इतकंच नाही तर देवांशी संगीतात पारंगत आहे. नृत्य आणि योगामध्येही ती खूप हुशार आहे. मागील महिन्यात मध्य प्रदेशातील देवासमधील पर्यान्षुक कराठे याने कोट्यावधीचे पॅकेज सोडून दीक्षा घेतली होती. १ फेब्रवारी २०२० मध्ये सुरतमध्ये ६५ जणांनी दीक्षा घेतली होती. त्यातील १७ जणांचे व २० वर्षांपेक्षा कमी आहे.
काय असते जैन धर्मात दीक्षा :
जैन धर्मातील दीक्षा घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे(Initiation in Jainism means renouncing all material comforts)
दीक्षा घेणाऱ्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते. जैन धर्मात याला ‘चरित्र’ किंवा ‘महानिभिश्रमण’(Mahanibhishramana) असेही म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अंहिसा, सत्य बोलणे, ब्रम्ह्यचार्य पालन, अस्तेय म्हणजे लालच न करणे, अपरिग्रह म्हणजे गरजेइतकेच संचय करणे यांचे पालन करावे लागते. भिक्षा मागून जीवन जगावे लागते.(One has to live by begging)सूती कपडे परिधान करावे लागतात. पायीच प्रवास करावा लागतो. दीक्षा घेताना आपल्या डोक्यावरील केस स्वत:च्या हाताने ओढून काढावे लागतात. त्यानंतर दीक्षा घेण्याचा क्रम पुर्ण होतो.