“अपुला तो देव करुनी घ्यावा..!” या म्हणी प्रमाणे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आज स्वःताच्या भक्तीने देवाच्या शोधात आहे. परंतु भक्ती या शब्दाला अध्यात्मिक क्षेत्रात पुरातन काळापासून फार मोठा इतिहास आहे. भारतातील विविध धर्मातील विविध संतांनी भक्तीचा एक वेगळा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असतो असे अनेकदा सांगत आलेत. परंतु आज ग्रामीण भागापासून ते शहरीभागांमध्ये देव पुजनाचे व भक्तीचे नविनतम उदाहरणे सध्या पहायला मिळतायतं.
पुर्वी काळात जो पर्यंत वाहनाचा शोध लागला ही नव्हता तेव्हा तो पर्यंत मंदिर..मशिद..चर्च पर्यंत जायला केवळ पायी जाणे व प्राणी समावेशीत गाडीचे साधन हाचं एक पर्यायी मार्ग होता परंतु कालांतराने वाहनांचा शोध लागला व भक्तांच्या भक्ती मार्गात देवा प्रती एक उपकाराची भावना निर्माण करुन वाहनमार्ग टाळुन “पायी-वारी” हा प्रकार उदयास आला संदर्भ हाच कि बदलत्या काळानुसार लोकांमध्ये भक्तीचे ही उद्योन्मुख प्रकार पहायला मिळताय.
कधीकाळी गावच्या हरिनाम किर्तन पारायणाला न जाणारे पंढरपूर जायच्या गोष्टी करतात...गाव-शहरातल्या मशिद-दरगाह ला कधी न झुकणारा व्यक्ती अजमेर शरीफ जायच्या गोष्टी करतो… घरासमोरील महादेवाच्या मंदिराचे दर्शन न करता मंदिराच्या ओट्यावर तंबाखू गुटखा खाऊन थुंकणारी तरुणाई केदारनाथ जायचा हट्ट करते…!
गाव-खेड्यांत आजच्या स्थीतीला शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाईट अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास १३१४ जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा परिस्थितीत गावाच्या जनतेचे कर्तव्य असते कि गावांतील प्राथमिक-माध्यमिक शाळांची परिस्थिती सुधारायला हवी. आज गावागावांत वर्गणी गोळा करून मंदिरांचे उद्यापण केले जातेय पण सत्य परिस्थिती अशी आहे की बहुतांश जि.प.प्राथमिक शाळेच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्यांच्या कडे बघायला एक ही भक्ती साधु तयार नाही. गावातल्या शाळेच्या आवारात सट्टा-जुगार खेळणारे तिर्थक्षेत्र जायचे स्वप्न पाहतात.
परंतु गावची सरस्वती भग्नावशेष करुन तिर्थक्षेत्राचा कोणताच देव पावेल अशी अपेक्षाही बहु होते.
देव हा प्रत्येकाचा आहे भक्ती ही प्रत्येकाने करावी..! परंतु कमकुवत असलेल्या गावच्या विकासाच्या भक्तीचा परिसर मोठमोठ्या तिर्थक्षेत्रांना भेट देऊन व मोठमोठ्या संतांच्या प्रवचनाने सुधारत नसतात तर त्यासाठी गाव पातळीवरचा प्रत्येक व्यक्तीने आपले गावाप्रती निखळ भक्ती ने प्रेम व गावचा सामाजिक व शैक्षणिक विकास हेच खरे तिर्थक्षेत्र दर्शन असते असे मनी बाळगायला हवे…! नाहीतर गरीबीतल्या भक्ताला श्रीमंत भक्तीचे आकर्षण..! फक्त फोटो काढून स्वश्रेष्ठ दाखविण्या सारखेच..!
(ॲड. मंथन आर. साळुंखे)


