चोपडा: (रजनीकांत पाटील) तालुक्यातील रुग्णसेवेला संजीवनी देण्याच्या दृष्टीने आमदार सोनवणे दाम्पत्याने दमदार पाऊल टाकले. येथील उपजिल्हा रुग्णालयात एक कोटी बारा लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार लाताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा शहरासाठी समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, मंगलाताई पाटील, सुखलाल कोळी यांसह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.


चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वीस खाटांचे अतिदक्षता कक्ष आणि पन्नास खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन आमदार लताताई सोनवणे यांनी केले. या कामासाठी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुविधा कक्ष आणि प्रतीक्षागृह बांधकामाचेही भूमिपूजन आमदार लताताई सोनवणे यांनी केले. या विकास कामांमुळे चोपडा उप जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेला बळकटी येणार आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण काम करीत असून चोपडा तालुक्यातील एकाही रुग्ण उपचारापासुन वंचित राहणार नाही यादृष्टीने आपले प्रयत्न असल्याचा संकल्प आमदार लताताई सोनवणे यांनी केला. याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे यांच्यासह चोपडा शहरासाठी समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी, मंगलाताई पाटील, सुखलाल कोळी, देविदास सोनवणे, ए.के.गंभीर यांसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासना कडून करण्यात आला. याप्रसंगी शिवराज पाटील, प्रताप पावरा, विकास पाटील, निवृत्ती पाटील, रामकृष्ण पाटील, सुधाकर पाटील, मंगल इंगळे, नंदू गवळी, प्रदीप बारी, दिव्यांग सर, गणेश पाटील, हेमराज कोळी, रामदास कोळी यांसह नागरिकांची उपस्थीती होती.


