अमळनेर: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील देशमुख नगर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तेजस मनोहर मगर या तरुणाने आज सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे गावाजवळच या तरुणाने सकाळी 10 वा आत्महत्या केल्याचे उघड झाले व बातमी वाऱ्यासारखी पसरली.

या तरुणाचा उद्या 13 रोजी साखरपुडा होणार होता. सकाळीस सलूनला जाऊन येतो असे घरच्यांना सांगून हा तरुण निघाला होता. मात्र काही वेळात त्याच्या मृत्यूची बातमीची शोककाळा पसरली व परिवारावर दुःखाचा कोसळला.
जानवे येथील पोलीस पाटील यांनी दिल्या माहितीवरून अमळनेर पो.स्टे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार हितेश चिंचोरे हे करीत आहेत.

