चुकीच्या मार्गाने स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या लोकांचे रेशनकार्ड बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

त्यामुळे देशातील अशा तब्बल 10 लाख बनावट शिधापत्रिका रद्द केल्या जाणार असून, त्यांच्याकडून रेशनची वसुलीही करण्यात येणार – असे केंद्र सरकारने म्हटले आहे
अपात्र रेशनकार्डधारकांची – यादी सादर करण्याचे निर्देश सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहेत. दुकानदारांकडून यादी आल्यानंतर, त्याचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला जाईल.
त्यानंतर अशा लोकांचे रेशनकार्ड रद्द करुन पात्र लोकांनाच मोफत धान्याचा लाभ देण्यात येईल
कोणाचे रेशन बंद होणार ?
दरवर्षी आयकर भरणाऱ्यांचे रेशन बंद होईल.
ज्यांच्याकडे 10 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, त्यांचे रेशनकार्ड रद्द होईल.
गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतले नसल्यास, हा लाभ बंद केला जाईल.
केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय – सर्व रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्वाचा आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

