पाचोरा :- माहेजी रेल्वे स्थानकापुढे बुधवार रोजी सायंकाळी 6:00 च्या सुमारास अप रेल्वे लाईन कि.मी 389/ 26 जवळ एका पुरुषाचा कृषी नगर एक्सप्रेस रेल्वे इंजिन च्या धक्क्याने जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेवेळी पोलिसांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. सदर व्यक्ती अनोळखी असल्याचे समजले.

सदर व्यक्तीचे वर्णन अंदाजित वय 35 वर्षे, उंची 5.5 रंग सावळा, बांधा मजबूत, अंगावर नेसणेस काळी पॅन्ट, चौकटी शर्ट असे आहे. घटनेची पाहाणी लोहमार्ग पोलीस सचिन भावसार यांनी केली. याबाबत पुढील कारवाई पाचोरा शहर पोलीस स्थानकाच्या हाती देण्यात आली आहे. सदर अनोळखी पुरुषाचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

