अमळनेर:- पाडळसरे येथील १६ वर्षीय अल्पयीन तरुणीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिनांक १४ रोजी सकाळी पेपर देण्यास जाते असे सांगून सदर मुलगी घराबाहेर पडली होती. मात्र संध्याकाळ झाली तरी ती परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरात तसेच गावात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. कोणीतरी तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने उषाबाई कोळी यांच्या फिर्यादीवरुन मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.


