जळगाव:- जिल्हा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नुकतीच लातूर येथे बदली झाली आहे.त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणुन अमन मित्तल यांनी नवीन पदभार स्वीकारला आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या सामाजिक चार्तुमास ह्या ऑनलाइन कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आले व त्या कार्यक्रमाचे प्रसारण जळगाव येथुन नवीन चावला यांनी केल्याने ह्या परिचयाच्या अनुशंगाने आज जळगाव येथे जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी जळगाव जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची सदिच्छा भेट घेऊन व संपूर्ण चातुर्मास कार्यक्रम लिपीबध्द करून पुस्तक रूपात राज्य कमेटी ने प्रकाशित केले ते भेट देण्यासाठी जळगाव जिल्हा अध्यक्ष मनोज जैन, उपाध्यक्ष डॉ सोनगीरकर,जळगाव तालुका अध्यक्ष महेश चावला, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, सचिव गिर्धर डाभी, सह सचिव डाॅ. नितिन डांढे, चंद्रशेखर देशमुख, सी एन डिजिटेक चे संचालक नवीन चावला, गुरूबंक्ष जाधवानी तसेच जळगाव तालुका कार्यकारी चे पदाधिकारी उपस्थित होते
ग्राहकाभिमुख व्यक्तिमत्व जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या रुपाने आज मिळाले आहे.त्याचा जिल्ह्याला लाभ मिळेल..