अमळनेर : तालुक्यातील नगाव येथील आश्रम शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या कालव्याच्या पाण्यात बुडून एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आसून या बाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
सविस्तर वृत्त असे की अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील अमित घुबड्या सोळंकी वय 13 हा 29 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास खेळायला जातो असे घरात सांगून बाहेर खेळायला गेला होता.मात्र दुपार झाली तरी तो घरी न आल्याने वडील घुबड्या सोळंकी आई अतिबाई व मालक सचिदानंद पाटील यांना त्यास दुपार पासून शोधण्यास सुरुवात केली होती.मात्र रात्री उशिरा पर्यंत शोध घेऊनही त्याचा कोणताच पत्ता लागत नव्हता.शुक्रवारी सकाळी त्यांनी पुन्हा शोधा शोध करायला सुरुवात केली.संपूर्ण गाव शोधले तरी त्याचा पत्ता लागत नव्हता.मात्र थोड्या वेळाने सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांनी नगाव शिवारात असणाऱ्या आश्रम शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या कालव्याच्या परिसरात शोध घेतला असता त्याठिकाणी त्याचे कपडे मिळून आले.घुबड्या सोळंकी यांनी पाण्यात उडी घेऊन त्याचा शोध घेतला असता.पाण्यात त्याचे डोके दिसले त्यांनी पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढून त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.घुबड्या सुरत्या सोळंकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


