जळगाव: जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस अधीक्षक, जळगाव आव्हान मागील ५/६ दिवसा पासुन जळगाव जिल्ह्यात लहान मुले/ मुली यांना पळविणारी टोळी असुन ती लहान मुले मुली एकटे दिसल्यावर त्यांना पळवून घेवून जातात या संदर्भात मोबाईल Whataap वर पोस्ट टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्ह्यात लहान मुले/मुली पळविणारी अशी कोणतीही घटना घडलेली नाही किंवा अशी कोणतीही गँग (टोळी) सर्किय नाही. ही केवळ अफवा आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक, जळगाव असे आव्हान आहे. आपल्या गावात, शहरात, कॉलनी मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडिया या माध्यमातुन लहान मुले/मुली पळविल्या संदर्भात जर कोणती पोस्ट व्हायरल होत असेल. तर आपण त्याबाबत स्वतः खात्री करावी अथवा आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याबाबत माहिती दयावी. विनाकारण जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. जेणे करुन जळगाव जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही.
जो कोणी अशा प्रकारच्या पोस्ट मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीवर सायबर अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच जे नागरिक गावात, शहरात, कॉलनीत किंवा पोलीस स्टेशनला अशा पोस्ट वरुन जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्हयांत कायदा व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत आव्हान अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.