तुम्हाला माहिती असेल, राज्यातील शेतकऱ्यांना ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ नुसार, जिरायती जमीन ही 2 एकरांपेक्षा कमी असल्यास, तर बागायती जमीन ही 20 गुंठ्यांपेक्षा कमी असली, तरी विकता येत नव्हती

विशेष म्हणजे, 2 एकरांच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीनही विकता येत नव्हती. त्यामुळे भांडण-तंटे वाढले होते. मात्र आता ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे
दरम्यान या निर्णयाची अमलबजावणी ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे –
पहा कसे आहेत नियम
नव्या प्रस्तावानुसार, आता ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ मध्ये बदल केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 एकर जिरायती शेतीऐवजी 20 गुंठे, तर बागायती जमिनीसाठी 20 गुंठ्याऐवजी 5 गुंठ्यांची मर्यादा ठरवून दिली जाणार आहे.
त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करणं सोप्पं होणार – असे राज्य शासनाने म्हटले आहे

