जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगावात आगमन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले. यात त्यांनी पन्नास खोके. . .एकदम ओके अशा घोषणा लिहलेले टिशर्ट घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसची महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केले. याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर निषेध केला आहे.


