असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.
त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे.
कशी आहे अधिसूचना
तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत.
वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे ग्राहकांना परत केले जातील.
पेन्शन किती मिळते – अटल पेन्शन योजना ही भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चालवली जाते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शनची हमी दिली जाते, –
जी 1,000 रुपये 2,000 रुपये 3,000 रुपये 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयांपर्यंत दिली जाते. ग्राहक या खात्यात पैसे जमा करतात, त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन मिळते.