जळगाव – महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 15/01/23 रोजीचा होणारा सातवा (७ वा) ‘ऋणानुबंध’ वधुवर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन.

अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था हॉल येथे आज
समाजाची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
मिटिंग चे अध्यक्ष समाजाचे जेष्ठ श्री. बबनराव हरीशेठ विसपुते स्वीकारले. अनेक समाज बांधवांनी मेळाव्याचे स्वरूप समजून काही नवीन कल्पना मांडल्या व मेळाव्याचे नियोजन उत्कृष्ट कसे होईल याचे नियोजन साठी
मेळावा समितीची पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. :
श्री. दीपक प्रल्हाद जाधव , मेळावा प्रमुख
श्री. दीपक बन्सी जगदाळे, मेळावा उप प्रमुख.
श्री. शशिकांत भिका जाधव मेळावा सचिव.
श्री. प्रशांत त्र्यंबकशेठ विसपुते मेळावा नियोजन समिती प्रमुख.
यांची निवड करण्यात आली.
तसेच श्री. विजय पुंडलिक सोनार यांची मेळावा स्वागत अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
इतर मेळावा समिती सदस्यांची निवड लवकरच जाहीर करण्यात येईल.
मेळावा यशस्वी करण्याकरिता सर्व समाज बंधूनी प्रयत्न करावे असे आवाहन महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष श्री संजय विसपुते यांनी केले आहे.या वेळी सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य व असंख्य समाज बांधव उपस्थित होते
आभार श्री विजय वानखेडे यांनी मानले व सूत्र संचालन प्रशांत विसपुते यांनी केले..

