जळगाव, येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनिंकडून फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले.
सुरवातीला संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय अरुणभाऊ श्रीपत नारखेडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले .त्यानंतर प्राचार्य महोदयांनी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या .त्यावेळी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती सुनिता बी.पाटील, समन्वयक श्री.एन. जी.बावस्कर व श्री.के.सी.वंजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता 11 वी च्या विद्यार्थिनींचे इयत्ता 12 वर्गातील विद्यार्थिनींनी जल्लोषात स्वागत केले.
विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात समूह नृत्य व गीत गायन करून कार्यक्रमास रंगत आणली.
*मिस फ्रेशर 2022 साठी अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. त्यातून मिस फ्रेशर ची निवड करण्यात आली.मिस फ्रेशर 2022 चा बहुमान इयत्ता 11 कॉमर्स ची विद्यार्थिनी कुमारी प्रिया परिहार हिने पटकाविला .
उपप्राचार्य श्रीमती सुनिता पाटील यांचे हस्ते मिस फ्रेशर हिला विजयाचा मुकुट देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या
या सर्व कार्यक्रमाचा जमलेल्या विद्यार्थिनींनी मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी आणि विद्यार्थिनींनी खूप मोलाचे सहकार्य केले .


